पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या शिक्षणाचा शुभारंभ हा 'अक्षरअभ्यासमं किंवा विद्यारंभम' द्वारे (Akashara Abhyasam/ Vidyarambham) केला जात असे. सध्या हि परंपरा भारतात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात प्रचलित आहे. तर 'अक्षरअभ्यासमं' म्हणजे नेमके काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल?
तर 'अक्षरअभ्यासमं' हा एक धार्मिक पारंपारिक कार्यक्रम आहे ज्यात विद्येची देवता सरस्वती देवी यांची पूजा केली जाते व बालकाच्या शिक्षणाचा शुभारंभ केला जातो ज्यायोगे ते मुल पुढील शिक्षण घेण्यास तयार होते. अक्षरं म्हणजे मुळाक्षरे आणि अभ्यासमं म्हणजे अभ्यास थोडक्यात 'मुळाक्षरांचा अभ्यास'. 'ओम' हे साधारणपणे बीजाक्षर मानले जाते बीज (हा संस्कृत शब्द) म्हणजे मुळ. अर्थात अक्षरअभ्यासमंसाठी बासर मधील गोदावरी व मांजरा नदीच्या संगम तीरावर वसलेले सरस्वती मंदिर हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सरस्वती देवी हि बुद्धी व ज्ञान यांची देवता आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन असे मंदिर आहे.
● बासर:
बासर हे पूर्वीच्या आंध्रप्रदेश व सध्या तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. बासर हे विद्येची देवता सरस्वती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भारतात फक्त दोनचं सरस्वती मंदिरे आढळतात एक तेलंगणा आणि दुसरे जम्मु काश्मीर. बासर हे साधारणपणे निझामाबाद पासून ३४.८ किमी, निर्मल पासून ७० किमी आणि हैदराबाद पासून सुमारे २०५ किमी अंतरावर वसले आहे.
● मंदिराचा इतिहास :
हिंदू पुराणानुसार असे सांगितले जाते कि ज्या ठिकाणी महर्षी वेदव्यास यांनी तपस्या केली होती तेथे सरस्वती मंदिर बनले आहे या मंदिराचे निर्माण कार्य चालुक्य राजाच्या काळात झाले. हे मंदिर 'अक्षर अभ्यासमं' साठी प्रसिद्ध आहे. हि एक प्राचीन परंपरा बालकांच्या जीवनातील शैक्षणिक शुभारंभाची औपचारिकता सूचित करतो.
● सध्याचे मंदिर :
संपुर्ण मंदिर परिसरातील वातावरण हे धार्मिक व शांतताप्रिय आहे. दसरा व महाशिवरात्री हे मुख्य उत्सव आहेत. सरस्वती, महालक्ष्मी आणि कालीमाता यामुळे बासर येथे नदीच्या संगमाबरोबरच भक्तीचा संगम देखील झाला आहे.
● वाहतुक व दळणवळण :
'ज्ञान सरस्वती मंदिर', बासर हे तेलंगणाची राजधानी हैदराबाद पासून २०५ किमी अंतरावर असून TSRTC परिवहनच्या बसेस तसेच रेल्वे हैदराबाद पासून सहज उपलब्ध होतात. महाराष्ट्रवासीयांसाठी तर पंढरपूर-निझामाबाद (वाया बासर) हि थेट ट्रेन उपलब्ध आहे.
तर बासरमधील सरस्वती मंदिरास नक्की भेट द्या.
◆ साभार : www.basartemple.org
No comments:
Post a Comment