पर्यटनाबाबत, प्रवासाबाबत असं म्हटलं जातं की काहीवेळा जिथे पोहोचायचं आहे त्या डेस्टिनेशनपेक्षाही, त्यासाठी केलेला प्रवास अधिक सुंदर, स्मरणीय आणि मनमोहक असतो. असंच काहीसा माझा अनुभव होता तो दार्जिलिंग बाबतीत. चहाचे मळे, घाटमाथा, निसर्ग सौन्दर्य, डोंगर रांगांच्या कुशीत वसलेली छोटी शहरे हे सारे निसर्गाचे वरदान अनुभवत दार्जिलिंगला पोहचणे हा एक स्वप्नवत अनुभव होता.
Welcome to Darjeeling
Welcome to Darjeeling
- दार्जिलिंग विषयी थोडक्यात: दार्जिलिंग हे उत्तरपूर्व भारतातील पश्चिम बंगाल मधील एक महत्वाचे थंड हवेचे ठिकाण असून त्यासोबतच येथील दर्जेदार चहा देखील जगप्रसिद्ध आहे. येथील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खूप भावते. दार्जिलिंग पासून बागडोगरा हे जवळचे विमानतळ आहे. तर न्यू जलपाईगुडी (NJP) हे जवळचे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे . या दोन्ही ठिकाणाहून दार्जिलिंग ला पोहचण्यास ३ तासाचा अवधी लागतो. दार्जिलिंग शहर हे ब्रिटीशानी इ. स. १८०० च्या सुमारास वसवले आणि आणि काळानुरूप सुगंधित चहा, हिमालयीन रेल्वे यासाठी प्रसिध्द पावले. View of Kanchenjunga
- पर्यटन विषयक: निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या दार्जिलिंग हे पर्यटनाची खाण आहे. येथे अगणित पर्यटन स्थळे आहेत जसे कि बर्फाने आच्छादलेला कांचनजंगा (जगप्रसिद्ध माऊंट एव्हरेस्ट येथेच आहे), बौद्ध मंदिरे, ऐतिहासिक चर्च, मंदिरे, डोंगर रांगांच्या उतारावरील चहाचे मळे, संग्रहालये, कला दालने, बाग बगीचे, धबधबे आणि केबल कारची स्वारी मधून अप्रतिम पर्वत रांगा उतारावरील चहाच्या मळ्यांचा अद्भुत नजारा आणि बरंच काही.....
Clock Tower
- दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे- टॉय ट्रेन दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे अर्थातच टॉय ट्रेनची सुरुवात १८८१ साली ब्रिटिशानीं केली. त्या काळात बैलगाडी, घोडेस्वारी याला पर्याय म्हणून टॉय ट्रेनची सुरुवात झाली. पूर्वी सिलिगुडी ते दार्जिलिंग असा हा नॅरो गेज मार्ग सध्या फक्त दार्जिलिंग शहरात कार्यरत आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक याच्या प्रेमात पडल्या शिवाय रहात नाही. नागमोडी वळणे, छोटी शहरे आणि सोबतच निसर्ग सौन्दर्याचा आनंद या ट्रेन मध्ये घेता येतो.
Heart of Darjeeling- "Darjeeling Himalayan Railway/Toy Train
- दार्जिलिंग चहा- दार्जिलिंग विषयी बोलणे हे चहाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जगाच्या नकाश्यावर दार्जिलिंग हे चहा साठीच प्रसिद्ध आहे. 'चहा' हे असे एक उत्साहवर्धक पेय जे प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. माझ्या भेटी दरम्यान अनेक चहाच्या मळ्यांना भेटी दिल्या आणि चहाचा मनमुराद आस्वाद घेतला. गुणवत्तेनुसार येथे चहाचे विविध प्रकार आढळतात. त्यांची किंमत साधारणपणे ७०० रु/किलो ते ५०,००० रु/किलो आहे.
World Famous Tea Garden
- हवामान: दार्जिलिंगला जाण्याचा सर्वोत्तम काळ कोणता? याचे उत्तर हे तुम्हाला काय आणि कशाचा आनंद घ्यायचा आहे यावर अवलंबून आहे. काही जण कांचनजंगाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी आणि उष्ण वातावरणातून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात दार्जिलिंगला येतात. तर काही बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हिवाळ्यात येतात तर काही जण मान्सूनचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात येतात.
- ट्रेकिंग: जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकिन असाल आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर दार्जिलिंग पर्वत रांगांमधील ट्रेकिंगचा आनंद जरूर घ्या. विविध पर्वत रांगांमधून, जंगलातून ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घेता येतो.
- वाहतूक व दळणवळण-
२) रेल्वेप्रवास: जवळचे रेल्वे स्थानक- सिलिगुडी (SGUJ ), न्यु जलपाईगुडी (NJP)
३) सिलिगुडी हुन खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत. (सिलिगुडी- दार्जिलिंग ६५ किमी २ तास) शेवटी मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि तुम्ही जगात कुठेही असाल तरी एक वेळ अवश्य दार्जिलिंगला भेट द्या.