नमस्कार,
आज आपल्यासमोर माझा पहिलावाहिला ब्लॉग प्रसिद्ध करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. मला लहानपणापासूनच प्रवासाची अत्यंत आवड आहे नवनवीन स्थळांना भेटी देणे ,तेथील संस्कृतीचा अभ्यास करणे आणि तेथील विविध क्षण कॅमेऱ्यामध्ये टीपणे हा माझा आवडीचा छंद आहे.
लहानपणापासून खुप ठिकाणी प्रवासाचा योग आला तो कधी कामानिम्मित तर कधी सहलीच्या रूपाने त्यामुळे आजपर्यंत जवळ जवळ निम्मे भारत दर्शन घडले आहे. आज मी त्यातल्याच एका प्रवासाचे वर्णन करीत आहे ते म्हणजे "जगप्रसिद्ध बालाजी मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानचं." तिरुपतीला जाण्याचा योग आला तो दिनांक ०६ /०६ /२०१४ रोजी. त्याच्या आधी २ दिवस इंजीनीरिंगच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यामुळे मूड अगदी रिलॅक्स होता. शिवाय तिरुपतीला जायचं हे १ महिना आधीच ठरलं होता आणि सोबतीला शालेय सवंगडी होते त्यामुळे मन अगदी प्रफुल्लित होतें. ठरल्याप्रमाणे ०६ तारखेला आम्ही सांगोल्याहून मिरज रेल्वे स्थानकात पोहचलो. प्लॅटफॉर्मवर कोल्हापूर-तिरुपती (हरिप्रिया एक्सप्रेस) अगदी दिमाखात हजर होती.
दुपारी १. ३० वाजता आम्ही मिरजहून प्रस्थान केले. सोबतीला शालेय जीवनातले मित्र असल्यामुळे आणि सर्वजण १२वी नंतर खुप दिवसाने एकत्र भेटत असल्यामुळे प्रवासास एक वेगळीच रंगत आली. तसे पाहिल्यास मिरज ते तिरुपती हे अंतर जवळपास ९०३ किमी म्हणजेच साधारणपणे २० तासांचे आहे पण विविध गप्पा गोष्टी आणि अनेक छबी टिपण्यात कसा वेळ गेला हे कळलंच नाही.
हुबळी पासून पुढे लोंढा स्थानकांकडे जातांना वाटेत क्रॉसिंगला टिपलेला एक क्षण
एक एक स्थानकं बेळगावी-हुब्बळी-होसपेठे -बेल्लारी-गुंटकल -कडपा -रेणीगुंटा असे कर्नाटकातून आंध्रप्रदेशात प्रवेश केला आणि सकाळी ९ वाजता तिरुपती स्थानकात पोहचलो. भूक लागल्यामुळे लागलीच साऊथ इंडिअन पदार्थावर ताव मारला आणि पुढे मार्गस्थ झालो.
तिरुपती ते तिरुमला हे ११. २ किमीचे अंतर आम्ही चालत पार करणार असल्याने त्या दृष्टीनें निघालो वास्तविक हे अंतर २०. ८ (by रोड )किमी आहे पण चालत म्हणजेच जवळपास ३५०० पायऱ्या पार करत आम्ही निघालो. वाटेत झूलॉजिकल पार्क, Deer park आणि विविध निसर्ग सौंदर्य दृष्टीस पडते .
Shree Venkateswara Zoological Park
तेथीलच हा एक क्षण :
Step No. 2567
Distance To Tirumala- 6.20 Km
वाटेतच आंध्रप्रदेश सरकारची बस गाठ पडली,
APSRTC BUS (तिरुपती-तिरुमला -तिरुपती )
अशारितीने ३५०० पायऱ्या चालत पार करत "श्रीनिवासा गोविंदा" या नामाचा जयघोष करीत डोंगररांगांमधील वाटेने साधारण ४ तासात तिरुमला म्हणजेच बालाजी मंदिरात पोहचलो. रांगेमधुन पुढे सरकत "श्रीनिवासा गोविंदाsss..गोविंदा" असा नामघोष करित अखेर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहचलो आणि श्री बालाजींचे दर्शनं घेऊन मन अगदी तृप्त झाले व खुप दिवसापासून असलेले दर्शनाचे स्वप्न पुर्ण झाले.
त्यानंतर पद्मावती देवीचे दर्शनं घेऊन आम्ही Shree Lakshmi Narayani Golden Temple, Vellore कडे रवाना झालो. Velloreला जाताना तामिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडले. सुवर्ण मंदिराचे दर्शन आटोपुन पुन्हा आम्ही तिरुपती रेल्वे स्थानकात पोहचलो आणि रात्री ९. ०० वाजता १७४१५/तिरुपती -कोल्हापूर (हरिप्रिया एक्सप्रेस) ने कोल्हापूर कडे निघालो.
आज आपल्यासमोर माझा पहिलावाहिला ब्लॉग प्रसिद्ध करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. मला लहानपणापासूनच प्रवासाची अत्यंत आवड आहे नवनवीन स्थळांना भेटी देणे ,तेथील संस्कृतीचा अभ्यास करणे आणि तेथील विविध क्षण कॅमेऱ्यामध्ये टीपणे हा माझा आवडीचा छंद आहे.
लहानपणापासून खुप ठिकाणी प्रवासाचा योग आला तो कधी कामानिम्मित तर कधी सहलीच्या रूपाने त्यामुळे आजपर्यंत जवळ जवळ निम्मे भारत दर्शन घडले आहे. आज मी त्यातल्याच एका प्रवासाचे वर्णन करीत आहे ते म्हणजे "जगप्रसिद्ध बालाजी मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानचं." तिरुपतीला जाण्याचा योग आला तो दिनांक ०६ /०६ /२०१४ रोजी. त्याच्या आधी २ दिवस इंजीनीरिंगच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यामुळे मूड अगदी रिलॅक्स होता. शिवाय तिरुपतीला जायचं हे १ महिना आधीच ठरलं होता आणि सोबतीला शालेय सवंगडी होते त्यामुळे मन अगदी प्रफुल्लित होतें. ठरल्याप्रमाणे ०६ तारखेला आम्ही सांगोल्याहून मिरज रेल्वे स्थानकात पोहचलो. प्लॅटफॉर्मवर कोल्हापूर-तिरुपती (हरिप्रिया एक्सप्रेस) अगदी दिमाखात हजर होती.
17416/KOP- TPTY Haripriya Express at Miraj Railway Station
हुबळी पासून पुढे लोंढा स्थानकांकडे जातांना वाटेत क्रॉसिंगला टिपलेला एक क्षण
एक एक स्थानकं बेळगावी-हुब्बळी-होसपेठे -बेल्लारी-गुंटकल -कडपा -रेणीगुंटा असे कर्नाटकातून आंध्रप्रदेशात प्रवेश केला आणि सकाळी ९ वाजता तिरुपती स्थानकात पोहचलो. भूक लागल्यामुळे लागलीच साऊथ इंडिअन पदार्थावर ताव मारला आणि पुढे मार्गस्थ झालो.
Shree Venkateswara Zoological Park
तेथीलच हा एक क्षण :
Step No. 2567
Distance To Tirumala- 6.20 Km
वाटेतच आंध्रप्रदेश सरकारची बस गाठ पडली,
APSRTC BUS (तिरुपती-तिरुमला -तिरुपती )
अशारितीने ३५०० पायऱ्या चालत पार करत "श्रीनिवासा गोविंदा" या नामाचा जयघोष करीत डोंगररांगांमधील वाटेने साधारण ४ तासात तिरुमला म्हणजेच बालाजी मंदिरात पोहचलो. रांगेमधुन पुढे सरकत "श्रीनिवासा गोविंदाsss..गोविंदा" असा नामघोष करित अखेर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहचलो आणि श्री बालाजींचे दर्शनं घेऊन मन अगदी तृप्त झाले व खुप दिवसापासून असलेले दर्शनाचे स्वप्न पुर्ण झाले.
Lord Tirupati Balaji (Source- Internet)
त्यानंतर पद्मावती देवीचे दर्शनं घेऊन आम्ही Shree Lakshmi Narayani Golden Temple, Vellore कडे रवाना झालो. Velloreला जाताना तामिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडले. सुवर्ण मंदिराचे दर्शन आटोपुन पुन्हा आम्ही तिरुपती रेल्वे स्थानकात पोहचलो आणि रात्री ९. ०० वाजता १७४१५/तिरुपती -कोल्हापूर (हरिप्रिया एक्सप्रेस) ने कोल्हापूर कडे निघालो.
हुब्बळी रेल्वे स्थानकांत काढलेला एक फोटो
17415/TPTY-KOP Haripriya Express at Hubbali Railway Station
Kolhapur Mahalaxmi Devasthanam
अखेर दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात पोहचल्यानंतर महालक्ष्मी देवींचे दर्शनं घेऊन आम्ही सांगोल्याकडे मार्गक्रमण केले.
Shree Mahalaxmi Devi Kolhapur
अशारितीने ६ दिवसाच्या प्रवासात आम्ही विविध संस्कृती,प्रदेश,भाषा चालीरीती यांचा अनुभव घेतला आणि सर्वजण मित्रमंडळी बरेच दिवसातुन भेटल्यामुळें आमचा प्रवास अगदी आनंदाचा आणि सुखकर झाला.
अशातऱ्हेने कहाणी सुफळ संपुर्ण. धन्यवाद .
पहिलाच ब्लॉग असल्यानें काही चुकले असल्यास क्षमस्व.